Akola Crime News : बिश्नोई बंधूंच्या संपर्कात असणाऱ्या 'शुभम'च्या तीन साथीदारांना अमरावतीतून अटक; बंदूक अन् काडतुसे जप्त

गैंगस्टर लॉरेंस बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असणाऱ्या शुभम लोणकर अकोला पोलिसांनी गजाआड केलं होतंय. तपास दरम्यान अनेक गोष्टी उघड झाले. शुभम बंदूक तस्करीचा मुख्य सूत्रधार असल्याचं समजलं. त्याने आतापर्यंत अनेकांना बंदुका सप्लाय केल्या आहेत.
Akola Crime News
Akola Crime Newssakal
Updated on

अकोला : गैंगस्टर लॉरेंस बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असणाऱ्या शुभम लोणकर अकोला पोलिसांनी गजाआड केलं होतंय. तपास दरम्यान अनेक गोष्टी उघड झाले. शुभम बंदूक तस्करीचा मुख्य सूत्रधार असल्याचं समजलं. त्याने आतापर्यंत अनेकांना बंदुका सप्लाय केल्या आहेत. अकोट पोलिसांनी आता त्याच्याकडून बंदूक खरेदी करणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून 1 बंदूक 5 जिवंत काडतूस आणि दोन मॅक्झिन जप्त केल्या. या तिघांना अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथून ताब्यात घेतलंय. अंकुश गायबोले (वय 30), रोहित कोकाटे (वय 25) आणि अक्षय अरबाड (वय 26) असे या तिघांची नावे समजले आहे. याप्रकरणी अधिक तपास अकोट शहर एसीपी अनमोल मित्तल(IPS) करीत आहेत.

अकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलीसांनी 16 जानेवारीला देशी पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं होतंय. 27 वर्षीय अजय तुकाराम देठे आणि 25 वर्षीय प्रफुल्ल विनायक चव्हाण या दोघांवर राहत्या घरून अटकेची कारवाई झाली होती. त्यावेळी 2 पिस्टलसह 9 जिवंत काडतुस जप्त करण्यात आलं होतंय. तपासा दरम्यान शुभम लोणकर हा या टोळीचा प्रमुख असल्यास समोर आले. शुभम हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोटचा रहीवासी आहे. 'तो' गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील वार्जे शहरात रहायचा, अकोट शहरचे पीएसआय राजेश जवरे आणि त्यांच्या पथकानं शुभलला पुण्यातून ताब्यात घेतलं होतंय.

आतापर्यत 6 आरोपींसह 3 बंदूक, 14 जिवंत काडतूस जप्त:

या संपूर्ण तपासात आतापर्यंत अकोला पोलिसांनी 3 बंदूक 14 जिवंत काडतूस आणि काही मॅक्झिन्स जप्त केल्या आहे. ही कारवाई कार्यवाही IPS अनमोल मित्तलसह स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके, पीएसआय राजेश जवरे यांनी केली आहे. लवकरच या संपूर्ण टोळीचा खुलासा अकोला पोलीस करणार आहेत, शुभमनं नेमक्या बंदूक कुठून आणल्यात? कित्येक जणांना विकल्या? नेमकं ही टोळी काय काम करते? यामध्ये अजून किती तरुणांचा समावेश आहे? याचाही तपास पोलीस करीत आहे.

Akola Crime News
Sambhaji Nagar Mahanagarpalika : ढोल वाजवून महापालिका करणार मालमत्ता जप्त

शुभम अन् गैंगस्टर बिश्नोईच्या संपर्कातील व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग् जप्त:

शुभम लोणकर हा गैंगस्टर लॉरेंस बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या चांगला संपर्कात होताय, त्यां दोघांच्या संपर्काचे अनेक विडिओ कॉल रेकोर्डिंग फोन रेकॉर्ड पोलिसांच्या हाती लागले. दुबई, इंटरनॅशनलमधील गुन्हेगारासोबत शुभमचा चांगला संर्पक होताय. फोन कॉल'मध्ये हे सर्व समजलं आहे, विशेष म्हणजे गैंगस्टर लॉरेंस बिश्नोई हा सध्या तुरुंगात असून 700 जणांच्या टोळीचा तो प्रमुख म्हणून अशी त्याची ओळख आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com