ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, पातूरमध्ये 15, बाळापूरात दोन तर वाडेगावात एक कोरोना पॉझिटिव्ह

Increasing incidence of corona in rural areas of Akola, 15 in Pathur, two in Balapur and one in Wadegaon
Increasing incidence of corona in rural areas of Akola, 15 in Pathur, two in Balapur and one in Wadegaon

अकोला  ः अकोल्यात कोरोना बाधितांची संख्या आता दोन हजार 246 वर जाऊन पोहचली आहे. मृत्यू 104 झाले असून मागील दोन दिवसांपासून मृत्यू थांबले असून, मात्र, बुधवारी (ता.22) नव्या 40 रुग्णांची भर पडली आहे.


बुधवारी सकाळी 40 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 24 महिला व 16 पुरुष आहेत. त्यातील 16 जण हे पातूर येथील, तीन जण हिवरखेड येथील, बोरगावमंजू, सातव चौक, खदान, अकोली जहॉंगीर, वाडेगाव, आलेगांव येथील प्रत्येकी दोन, तर मोठी उमरी, लोकमान्य नगर, अकोट, सिंधी कॅम्प, जीएमसी हॉस्टेल, खडकी, विजय नगर, न्यू भीम नगर व रामदासपेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. दरम्यान काल रात्री रॅपीड ×न्टीजेन टेस्टमध्ये 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. सायंकाळी एकही पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त नाही.

19 जणांना डिस्चार्ज
बुधवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तिन जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून एका जण, कोविड रुग्णालय मूर्तिजापूर येथून सात जणांना, आयकॉन हॉस्पिटल येथून एक जण तर हॉटेल रेजेन्सी येथून सात जणांना अशा एकूण 19 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

पातूरमध्ये कोरोनाचे पंधरा नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 154  
पातूरमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रॅपिड एंटीजन टेस्ट केली जात आहे. त्यात आणखी नवे रुग्ण आढळून आले आहेत. पातुरातील रुग्णांची संख्या 154 वर झाली असून, मिलिंदनगरमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत.
पातूर येथे घेण्यात आलेल्या नमुन्यांपैकी प्राप्त अहवालानुसार 45 जणांची रिपोर्ट निगेटिव्ह आले तर पंधरा जणांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामधील तेरा रुग्ण मिलिंदनगर येथील तर दोन रुग्ण आलेगाव येथील आहेत. त्यामुळे आता पातूर शहरासह तालुक्‍यात 154 कोरोना बाधित रुग्ण झाले असून, त्यापैकी 65 रुग्ण उपचार घेत आहेत. 81 जणांनी कोरोनावर मात केली आहे. पातुर तालुक्‍यातील आलेगाव येथील भाजी विक्रेत्यांला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्याअनुषंगाने पातूरचे तहसीलदार दीपक बाजड व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्‍टर विजयसिंह जाधव यांनी रॅपिड एंटीजन टेस्टचे आयोजन केले होते. तेथे एकूण तेरा नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता पिंपळखुटा, मळसूरसह आलेगावातही कोरोनाचा वाढत्या संक्रमणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बाळापूरात दोन तर वाडेगावात एक कोरोना पॉझिटिव्ह
बाळापूर शहरासह तालुक्‍यात आज तीन कोरोना बाधितांची भर पडली आहे. यामध्ये बाळापूर शहरात दोन तर वाडेगावातील एका रुग्णाचा समावेश आहे.
शहरात कोरोनाचा पादुर्भाव वाढत असल्याने शहरातील 57 जणांची कोरोना रॅपिड टेस्ट घेण्यात आली. यामध्ये आज बुधवारी (ता.22) रोजी दोन महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गोपीचंद पवार यांनी सांगितले. आज आढळून आलेल्या दोन्ही महिला लोटनापूर भागातील असून, 70 व 64 वयोगटातील आहेत. बुधवारी सर्वोपचार रुग्णालयातून प्राप्त झालेल्या अहवालात तालुक्‍यातील वाडेगाव येथील पुन्हा एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने वाडेगावात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागामार्फत वाडेगावात जनजागृती करण्यासाठी पथक दाखल झाले आहे.

आगर येथे निर्जंतुकिकरण
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आगर येथे फ्रेंड्‌स ग्रुप यांचा पुढाकाराने फवारणी करण्यात आली. सागर येथील प्रसिद्ध डॉक्‍टर संतोष ठाकरे तसेच त्यांच्या फ्रेंड्‌स ग्रुपद्वारे कोरोना विषाणू संसर्ग वाढत असलेल्या ग्रामीण भागात संसर्ग टाळण्यासाठी ट्रॅक्‍टरद्वारे सोफिया 200 होमिओपॅथिक औषधाची फवारणी केली जात आहे. आगर येथे ता. 19 जुलै रोजी ही फवारणी करण्यात आली आहे. ही फवारणी निशुल्क करण्यात आली. ग्रामस्थांनी फ्रेंड्‌स ग्रुप आगर तसेच डॉक्‍टरांचे अभिनंदन केले.

बार्शीटाकळी शहरात 61 व्यक्तींवर कारवाई
कोरोनाचे संक्रमण अधिक वाढत असल्याने जिलहधिकारी यांच्या आदेशान्वये अकोला जिल्ह्यात तीन दिवस लॉकडाउन होते. या लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्या बार्शीटाकळी येथील 61 नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यात माक्‍स न वापरता विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींचा समावेश होता. ठाणेदार तिरुपती अशोक राणे व त्यांचे सहकाऱ्यांनी संपूर्ण तीन दिवस संपूर्ण बार्शिटाकळी शहरामध्ये अभियाना राबवून ही कारवाई केली.

(संपादन-विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com