अकोला : आजपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anganwadi workers

अकोला : आजपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन

मानोरा - राज्यातील २ लाख अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना मार्च व एप्रील २०२२ चे मानधन द्यावे, या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर उद्या १० मेपासून बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस ब्रिजपाल सिंह यांनी शनिवारी ही माहिती दिली.

राज्यातील अंगणवाडी सेविकांना ८३२५ रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांना ५९७५ रुपये तर मदतनीसांना ४४२५ रुपये दरमहा मानधन दिले जाते. एवढ्या मानधनामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही. मानधना बाबतीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेठबिगारासारखे वागविले जाते. मार्च व एप्रील २०२२ या दोन महिन्यांचे मानधन थकीत आहे, ते मिळावे ही प्रमुख मागणी आहे. याच बरोबर अंगणवाडी कर्मचाऱ्यांची नियुक्ती, कामाच्या वेळा, त्यांच्या कामाचे स्वरुप, त्यांचे मानधन व दंडात्मक कारवाई हे सर्व शासन करते. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनी व अंशकालीन न समजता त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा. आदी मागण्या आहेत. या बेमुदत आंदोलनात अंगणवाडी वाशीम जिल्ह्यासह मानोरा तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचाही सहभाग असल्याचे संघटनेच्या प्रमिलाताई पखाले, वनिता कावरे यांनी सांगितले आहे.

Web Title: Indefinite Agitation Of Anganwadi Workers From Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top