
संग्रामपूर : तालुक्यातील वरवट बकाल येथील कला, वाणिज्य महाविद्यालयाचा खेळाडू वैभव देशमुख याची भारतीय आट्यापाट्या संघात निवड झाली होती. दरम्यान पश्चिम बंगालमधील हसी मारा येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी भारतीय आट्यापाट्या संघाला सुवर्णपदक मिळवून देत आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये नेत्रदीपक यश मिळवले आहे.