जिल्ह्यातील उद्योगांना लागली घरघर!, उद्योग सुरू मात्र काम बंद; मजूर, तांत्रिक कामगार, कच्चा मालाचा अभाव

अनुप ताले 
मंगळवार, 30 जून 2020

जिल्ह्यामध्ये ६० ते ७० टक्के उद्योग सुरू आहेत. मात्र ते केवळ नावालाच! जिल्हा अंतर्गत व जिल्हा बाहेरून उत्पादनाची मागणी घटल्याने व मजुरांचा, तांत्रिक कामगारांचा प्रचंड तुटवडा जाणवत असल्याने, उद्योग सुरू मात्र काम बंद, अशी स्थिती असून, यामुळे जिल्ह्यातील उद्योगांना घरघर लागली आहे.

अकोला  ः जिल्ह्यामध्ये ६० ते ७० टक्के उद्योग सुरू आहेत. मात्र ते केवळ नावालाच! जिल्हा अंतर्गत व जिल्हा बाहेरून उत्पादनाची मागणी घटल्याने व मजुरांचा, तांत्रिक कामगारांचा प्रचंड तुटवडा जाणवत असल्याने, उद्योग सुरू मात्र काम बंद, अशी स्थिती असून, यामुळे जिल्ह्यातील उद्योगांना घरघर लागली आहे.

अकोला जिल्ह्यांमध्ये जवळपास दीड ते पावणे दोन हजार मोठे, मध्यम व लघु उद्योग उभारलेला आहेत. त्यापैकी कृषी आधारित व प्रशासनाने परवानगी दिलेले इतर काही, असे जवळपास ४० ते ५० टक्के उद्योग सुरू असून, औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे ६० ते ७० टक्के उद्योग सुरू आहेत. परंतु परराज्यातून आलेल्या जवळपास १०० टक्के मजूरांनी त्यांच्या राज्यात स्थालांतरण केले असून, त्यांचेपैकी परत येणाऱ्या मजूरांची संख्या बोटावर मोजण्याएवढी आहे. शिवाय तांत्रिक कामगार उपस्थित नसल्याने इतर मजूर व कच्चा माल असूनही उद्योगांना कार्यरत ठेवणे अशक्य झाले आहे. लॉकडाउन व बाजारपेठ दीर्घकाळ बंद राहाल्याने मागणीसुद्धा घटली असून, कच्चा माल मिळण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत. या सर्व कारणांनी जिल्ह्यात उद्योग सुरू असल्याचे दिसत आहेत परंतु, त्यांची कामाची गती अतिशय संथ असून, बहुतांश उद्योग तर बंदच पडले असल्याचे चित्र आहे.

कामगाराच्या सुरक्षेवर भर
आहेत तेवढ्या कामगारांची योग्य सुरक्षा घेण्यासाठी उद्योगांकडून भर दिला जात आहे. त्यासाठी कामगारांना सॅनिटाईझ, हँडवॉश, स्वच्छ पाण्याची उपलब्धता करून दिली जात असून, आवारात येणाऱ्या वाहनांची सुद्धा निर्जंतुकीकरण केले जात आहे. मजुरांचे येताना, जाताना, काम करताना, जेवण करताना, फिजिकल डिस्टन्स ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या असल्याचे उद्योजकांकडून सांगण्यात आले आहे.

गेल्या अडिच ते तीन महिन्यात उद्योगाला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, ते भरून काढणे, हीच मोठी समस्या आहे. सध्याही मजूर, तांत्रिक कामगार व इतर आवश्यक सुविधांच्या अभावामुळे उद्योग सुरू असले तरी ते कार्यरत आहेत असे म्हणता येणार नाही. तेव्हा मजुरांची संख्या आणि उत्पादनाची मागणी वाढली तरच उद्योगाला गती येऊ शकेल तसेच शासनाकडून उद्योगाला अनुदान, आर्थिक सवलती मिळणे आवश्यक आहेत.
- उन्मेष मालू, अध्यक्ष अकोला इंडस्ट्रीज असोसिएशन अकोला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The industries in the akola district started whining! Lack of labor, technical workers, raw materials

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: