- मिलिंद जामनिक
मूर्तिजापूर - गत काही महिन्यांपासून महागाईने सर्वसामान्य त्रस्त झाला आहे. त्यातच आता खाद्यतेल आणि इतर अनेक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. अनेक छोट्या-मोठ्या शहरासह ग्रामीण भागात भाजीपाल्याची खरेदीसाठी ५०० रुपयांची नोट सुद्धा कमी पडत आहे. वस्तूंचे भाव कडाडले आहेत. लाडक्या बहिणींना महागाईचा फटका बसल्याने त्यांचे आर्थिक बजेट कोलमडल्याचे बोलल्या जात आहे.