esakal | कपाशी घटली, सोयाबीन, तूर पिकांचा बोलबाला
sakal

बोलून बातमी शोधा

कपाशी

कपाशी घटली, सोयाबीन, तूर पिकांचा बोलबाला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शरद येवले
मंगरुळपीर : तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी खरिपात सर्वाधिक सोयाबीन व तुरीची पेरणी केली आहे. कधीकाळी या तालुक्यात कपाशीचा पेरा सर्वाधिक होत होता. मात्र, गुलाबी बोंडअळीने कापूस नामशेष झाला आहे. (Instead of cotton, farmers prefer soybean and tur crops)


मंगरुळपीर तालुक्यातील शेतकरी गेल्या तीन ते चार वर्षांपासून आस्मानी संकटात सापडला आहे. तीन-चार वर्षांपासून पाहिजे तसा पाऊस पडत नसल्याने तो हताश झाला आहे. त्यामुळे त्याच्यावर बँकेचे कर्ज कमी होण्याच्या जागी वाढतच आहे. यावर्षी खरिपाच्या सुरुवातीला वरून राजाने तब्बल एक महिना हुलकावणी दिली. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आले. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला. परंतु, काही भागात शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे.

हेही वाचा: भाषण सुरु असतानाच अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा सौम्य झटका, प्रकृती स्थिर

अजूनही तालुक्यातील प्रकल्प, तलाव व विहिरी पाहिजे तेवढ्या भरल्या नाहीत. ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांना रब्बी हंगामात हात चोळत बसण्याची वेळ येईल, असा ही तर्क लावल्या जात आहे. मंगरुळपीर तालुक्यातील जमिनी क्षेत्रफळ ७८ हजार हेक्टर आहे. पण, वहितीत मात्र, ६१ हजार २०० हेक्टरच आहे. त्याचे मुख्य कारण अपेक्षित पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये उदासीनता वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पडीत पडल्या आहे.


२०२१ खरिपाचा अहवाल
पीक, सरासरी क्षेत्रफळ व पेरणी क्षेत्र (हेक्टर)
ज्वारी ७१५.७७ ११२.५
मका ११०.९६ ३८
बाजरी ०० ००
तृण धान्य ८२८.७३ १५०.५
तूर ८४८५.९७ ९८६९.९४
मूग १००५.५१ ६०१.०७
उडीद १२७७.१७ ९९९
इतर कडधान्य १०८३४.६५ ११६२१.१४
एकूण कडधान्य १२३८३ ००
तिळ १३१.५९ ५२.५६
सोयाबीन ४६९६८.०८ ४७४३३.५
इतर १८५ ००
कपाशी २१९७.५७ १२५६.९
ऊस ३५, ८.८ ०५
–--------------------------------------------
एकूण खरीप ६१२७९.६२ , ६११७०.७४ (टक्केवारी ९९.८२)सोयाबीन, तुरीशिवाय पर्याय नाही
सरासरी क्षेत्रफळापेक्षाही सोयाबीन व तुरीचे क्षेत्रफळ हेक्टरी जास्त असून, तालुक्यातील शेतकऱ्यांना इतर पिकाच्या पेऱ्यामध्ये रुची नसल्याचे मुख्य कारण म्हणजे पाऊस. दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने सोयाबीन व तूर या पिकाशिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्यांजवळ नाही.

Instead of cotton, farmers prefer soybean and tur crops

loading image