esakal | पोफळी येथे वृद्धाने घेतला गळफास
sakal

बोलून बातमी शोधा

It has been seen that an old man committed suicide by hanging himself at Pofli

या घटनेची फिर्याद मृतकाचा नातेवाईक गजानन रमेश गावंडे (रा.पोफळी) ता.मोताळा याने धामणगाव बढे पोलिस स्टेशनला दिली. सदर घटनेची माहिती मिळताच ठाणेदार चंद्रकांत ममताबादे यांच्यासह पोहेका मोहनसिंग राजपूत यांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोफळी येथे वृद्धाने घेतला गळफास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धामणगाव बढे (बुलडाणा) : स्थानिक धामणगाव बढे पोलिस स्टेशन अंतर्गत पोफळी येथील शिवाजी जनार्दन गावंडे (वय 50 वर्ष) हा 18 डिसेंबरच्या संध्याकाळी साडेसात वाजेदरम्यान शेतात जातो म्हणून सांगितले होते. परंतु शनिवारी (ता.19) पोफळी येथील माणिकराव गावंडे यांच्या शेतातील धुर्‍यावरील बाभळीचे झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.

या घटनेची फिर्याद मृतकाचा नातेवाईक गजानन रमेश गावंडे (रा.पोफळी) ता.मोताळा याने धामणगाव बढे पोलिस स्टेशनला दिली. सदर घटनेची माहिती मिळताच ठाणेदार चंद्रकांत ममताबादे यांच्यासह पोहेका मोहनसिंग राजपूत यांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय बुलडाणा येथे हलवण्यात आले. याप्रकरणी धामणगाव बढे पोलिस स्टेशनला मर्ग दाखल करण्यात आला असून आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. या घटनेचा पुढील तपास एपीआय चंद्रकांत ममताबादे करीत आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image