Akola Crime: सुनगाव (ता. जळगाव जामोद) येथे २९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपल्याची घटना घडली. आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी बीएनएस कलम १०८, ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
जळगाव जामोद : तालुक्यातील सुनगाव येथील एका २९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १९ फेब्रुवारी रोजी घडली. या घटनेमुळे सुनगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.