Akola Robbery : सराफा दुकान लुटीचा पर्दाफाश! भाड्याच्या खोलीत राहून केली रेकी, अन् टाकला दरोडा

अकोला शहरातील श्री सप्तश्रृंगी अलंकार केंद्र येथे झालेल्या धाडसी सराफा जबरी चोरी प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांनी ७२ तासांत केला.
Crime

Crime

sakal

Updated on

अकोला - शहरातील आदर्श कॉलनी परिसरातील श्री सप्तश्रृंगी अलंकार केंद्र येथे झालेल्या धाडसी सराफा जबरी चोरी प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांनी ७२ तासांत केला. या प्रकरणात आरोपी रोहनसिंग सतनामसिंग बावरा (रा. जामनेर रोड, भुसावळ, जि. जळगाव) याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल असा एकूण २५ लाख ५८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com