MLA Prakash Bharsakale Refutes BJP Links to Jiten Baretha
sakal
अकोट : अकोट शहरातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून ‘एमआयएम’च्या पाचही नगरसेवकांनी जितेन बरेठिया यांना स्वीकृत नगरसेवक पदासाठी समर्थन दिल्याची माहिती समोर आली आहे. माजी नगराध्यक्ष व तत्कालीन भाजपचे ज्येष्ठ नेते रामचंद्र बरेठिया यांचे पुत्र असलेल्या जितेन बरेठिया यांच्या निवडीमुळे पुन्हा एकदा भाजप–एमआयएम अप्रत्यक्ष युतीची चर्चा रंगली आहे.