अकोला : कारंजा गुंड प्रवृत्तीने ग्रासला

पोलिसांच्या नाकावर टिच्चून तडीपार गुंडांची अरेरावी
crime news
crime newssakal

कारंजा (लाड) - वैश्विक महामारीच्या संकटाने अल्पसा विराम दिला असतानाच लघुव्यावसायिक यांच्या समोर गुंडप्रवृत्तीच्या लोकांचे संकट उभे ठाकले असल्याचे दि. १४ मे रोजी एका तडीपार दाम्पत्याने गळ्यातील पोथ विणून घेतल्यानंतर पैसे मागितले म्हणून एका पोथ विणणाऱ्या लघुव्यावसायिकाला अमानुष मारहाण केलेल्या घटनेवरून अधोरेखित होते. तेव्हा तुम्हीच सांगा आम्ही व्यवसाय करायचा की, तडीपार गुंडांशी भांडण असा सवाल उपस्थित करीत आहे.

गत वर्षी संपूर्ण जग कोरोना या वैश्विक महामारीने ग्रासले होते. या वैश्विक महामारीच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी शासनाने लॉकडाऊन ही प्रणाली अंमलात आणली होती. त्यामुळे, संपूर्ण देशाची आर्थिक व्यवस्था कोलमडून पडली असतानाच हातावर आणून पानावर खाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची तथा लघुव्यावसायिकांची दयनीय अवस्था होऊन त्रेधातिरपिट उडाली होती. हाती काम नाही, जमापुंजी नाही, परिवाराचा उदरनिर्वाह करावा कसा, असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर उभे ठाकले होते. यामध्ये, काही लोकांनी अक्षरशः आपली जीवन यात्रा संपविली तर, काही लघुव्यावसायिकांनी आत्मविश्वास डगमगू न देता पुन्हा जोमाने कामाला लागेल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविस्तर असे, की कारंजा शहरातील सुवर्णकार गल्ली म्हणून परिचित असलेल्या सराफ लाईन येथे स्थानिक मंगरूळवेश अस्ताना येथील रहिवाशी १८ वर्षीय युवक नामे शेख सलीम शेख सवारी हा आपल्या परिवाराचा गाडा हाकण्यासाठी सुवर्णकार दुकानासमोर पोथ गाठण्याचा व्यवसाय करतो. या लघुव्यावसायीकडे तडीपार गुंडप्रवृत्तीच्या दाम्पत्याने दि. १४ मे रोजी दुपारच्या पोथ विणण्यास दिली होती. सदरहू, पोथ गाठणे झाल्यानंतर शेख सलीम या लघुव्यावसायिकाने आपल्या मजुरीचा मोबदला मागितला असता अगोदरच अनेक गुन्हे दाखल असलेल्या गुंडप्रवृत्तीचे सुभाष गाडगे, बबिता गाडगे या दाम्पत्याने पैसे न देता फिर्यादी यास अमानुष मारहाण, शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर, फिर्यादी याने स्थानिक शहर पोलिस स्टेशन गाठून आपली हकीकत बयान करुन तक्रार दाखल केली. याप्रकरणी, कारंजा शहर पो.स्टे. पो. नि. आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रशांत जाधव यांच्या अधिपत्याखाली पो. उप.नि. अंभोरे यांनी कलम ३२३, ५०४, ५०६ अन्वये कारवाई केली असल्याची माहिती प्राप्त आहे. या घटनेवरून स्थानिक व्यावसायिक यांच्यामध्ये धास्ती निर्माण झाली असून, स्थानिक पोलिस प्रशासनाने अशा, गुंडप्रवृत्तीच्या तथा तडीपार यांचा शोध घेऊन शहरात शांतता टिकविण्यासाठी ठोस पावेल उचलावीत अशी चर्चा सुज्ञ नागरिक करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com