

Akola News
esakal
बार्शीटाकळी: तालुक्यातील महान येथील काटेपूर्णा जलप्रकल्पातील पाण्याची स्थिती रविवारी (ता.१२) सकाळी ७ वाजताच्या अहवालानुसार समाधानकारक असली तरी, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सध्या जलाशयाची पातळी ३४२.९६ मीटरवर असून, उपयुक्त जलसाठा ३१.६०१ दशलक्ष घनमीटर इतका नोंदविण्यात आला आहे. प्रकल्पातील पाणीसाठ्याची टक्केवारी ३६.५९ टक्के आहे.