

Khamgaon APMC Extends Financial Aid of Rs 11 Lakhs for Drought-Affected Farmers
Sakal
खामगाव : पावसाच्या अवकृपेमुळे राज्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. बाजार समितीच्या वतीने 'मुख्यमंत्री सहायता निधी' साठी ११ लाख रुपयांचा भरीव निधी देण्यात आला असून, या मदतीचा धनादेश राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.