कमळाच्या ‘विजया’ने शिवसेना ‘वंचित’; विजयी ‘वसंत’ फुलला!

वंचित बहुजन आघाडीची भक्कम साथही भाजपला मिळाल्याचे निकालावर नजर टाकल्यास दिसून येते
BJP
BJPBJP

अकोला : विधान परिषदेच्या (Legislative Council elections) अकोला-बुलडाणा-वाशीम स्थानिक प्राधिकार मतदारसंघात भाजपचे वसंत खंडेलवाल (Vasant Khandelwal) यांनी शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांची विजयी घोडदौड रोखण्यात यश मिळविले आहे. भाजपच्या (BJP) या विजयाने बाजोरिया यांच्या विजयी चौकार लगावण्याच्या स्वप्नांवर पाणी फेरले केले. तीन जिल्ह्यांच्या या मतदारसंघात विजयाची रणनीती आखण्यातही भाजप महाविकास आघाडीच्या तुलनेत उजवे ठरले.

शिवसेनेला (shiv sena) धक्का देत भाजपने विजयश्री खेचून आणली. महाविकास आघाडीकडून लढलेले शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपोकिशन बाजाेरीया यांना मतविभाजनाचा फटका बसल्याने ३३४ मतांवर समाधान मानावे लागले. भाजपचे वसंत खंडेलवाल यांना ४४३ मतं मिळाली. विजयाचा चौकार लावण्यात अपयशी ठरलेल्या बाजाेरीयांची (Gopikishan Bajoria) ‘विकेट’ तब्बल १०९ धावांनी घेत भाजपने विजयाचा ‘वसंत’ फुलविला. भाजपचे संख्या २४६ असल्याने महािवकास आघाडीची मते फुटल्याने कमळ फुलले असून, वंचित बहुजन आघाडीची भक्कम साथही भाजपला मिळाल्याचे निकालावर नजर टाकल्यास दिसून येते.

BJP
अंकिता लोखंडेचा ‘एंगेजमेंट लूक’ सोशल मीडियावर व्हायरल

शिवसेनेच्या पराभवाची कारणे!

  • जिल्हा परिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी पुढाकार घेत बांधलेली सर्व पक्षीय मोट वंचितच्या जिव्हारी लागली. परिणामी ‘वंचित’ने शिवसेनेला ‘अर्थ’पूर्ण धडा शिकविला.

  • विधान परिषद निवडणुकीत वंचितने भाजपला साथ दिल्यास पुढील वर्षी हाेणाऱ्या अकाेला जि. प. अध्यक्ष-उपाध्यक्ष व सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपने वंचितला पाठिंबा द्यावा या समिकरणावर विधान परिषदेच्या उमेदवारासाठी भाजपने पाठिंबा मिळविला.

  • शिवसेनेतील जिल्हा प्रमुख नितीन देशमुख व गोपीकिशन बाजोरिया यांच्यातील गटागटाच्या राजकारणाचा फटका विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेला बसला.

‘वंचित’मुळे सारकारला भाजपचा विजय

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडे ८५ मतं होती. यातील वाशीम जिल्ह्यातील कारंजा, मंगरूळपीर आणि मानोरातील वंचितचे २२ नगरसेवक ऐन निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रवादीमध्ये गेले होते. यात उरलेल्या वंचितच्या मतदारांनीही भाजपला मदत केल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे. ‘वंचित’मुळे भाजपचा विजय साकारला तर शिवसेनेला विजयापासून वंचित करीत १८ वर्षांचे या मतदारसंघातील वर्चस्व संपुष्टात आले.

BJP
‘गॅंगरेप’चा बनाव रचणे तरुणीच्या अंगलट; प्रकार उघडकीस येताच गुन्हा

पराभवाचे काय आत्मचिंतन करणार

भाजपचे विजयी उमेदवार वसंत खंडेलवाल यांचे अभिनंदन करताना शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांनी नव्या जबाबदारीला वसंत खंडेलवाल न्याय देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. सलग १८ वर्षे आमदार म्हणून निवडून देणाऱ्या मतदारांचे आभार मानण्यासही ते विसरले नाहीत. विजयाचे चिंतन करावयाचे असते पराभवाचे काय आत्मचिंतन करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जय-पराजय हा ठरलेलाच. आता पुढच्या कामाला लागायचे, असे बाजोरिया म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com