
अकोला : मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेतून मुलींना सक्षम बनविण्यासाठी त्यांचे शिक्षण योग्यरित्या व्हावे, यासाठी शासनाकडून वयाच्या १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत टप्प्याटप्प्याने एक लाख एक हजार रुपये दिले जाणार आहेत. अंगणवाडी सेविकांकडून या योजनेसाठी अर्ज भरुन घेता येणार असून, गावागावांत योजनेची अंगणवाडी सेविकांकडून माहिती दिली जात आहे.