सौर ऊर्जेचा वापर करू अन् पर्यावरणाचा विद्‍ध्वंस टाळू | akola | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akola

सौर ऊर्जेचा वापर करू अन् पर्यावरणाचा विद्‍ध्वंस टाळू

अकोला : पेट्रोल, डिझेल, कोळश्‍याच्या उपयोगितेतून मोठ्या प्रमाणात कार्बंनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन होत असून, त्यातून पर्यावरणाचा विद्‍ध्वंस होत आहे. त्यामुळे ग्लोबल वार्मिक व जलवायु परिवर्तनाची नागरिकांना जाणीव होऊन सौरऊर्जेचा नित्य उपयोग व्हावा, यासाठी संपूर्ण राष्ट्रात सौर उर्जेचे जनजागरण करत सोलर गांधी म्हणून ओळख असणारे प्रा. चेतनसिंह सोळंकी भारतभरात त्यांच्या अभिनव बसमधून तब्बल एक लाख किलोमिटरची यात्रा करीत असल्याची माहिती त्यांनी रविवारी (ता.२३) अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेतून दिली.

हेही वाचा: साउंड रेकॉर्डिंग क्षेत्रातील अग्रणी चारुदत्त जिचकार

प्रा.चेतनसिंह सोळंकी एक शिक्षक, वैज्ञानिक, शोधकर्ता व नवप्रवर्तक असून, आयआयटी मुंबईमध्ये कार्यरत आहेत. या यात्र अभियानात त्यांनी ११ वर्षापर्यंत घरी न जाता केवळ सोलर यात्रा बस मध्येच राहण्याचा संकल्प केला आहे. गंभीर व भयावह जलवायु परिवर्तन संदर्भात या एनर्जी स्वराज यात्रा अभियानात नागरिकांनी शंभर टक्के सोलर ऊर्जेचा उपयोग करावा यासाठी व्यापक जनआंदोलन त्यांनी उभे केले असून, त्यांच्या ऊर्जा विश्‍वातील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना मध्यप्रदेश सरकारने मध्यप्रदेश सौर ऊर्जेचा ब्रांड एम्बेसडर बनविले आहे. त्यांनी आयआयटी मुंबईत प्रमुख सौर प्रकल्पाचे नेतृत्व करून ७.५ मिलियन कुटुंबांना सौर ऊर्जेचा उपयोग शिकवून सोलर लँप डिजाईन केले. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित सुद्धा करण्यात आले आहे.

हेही वाचा: सिंधुदुर्गात कोरोनाचा कहर; रुग्ण वाढले तरी वैद्यकीय सज्जतेत होतेय सुधारणा

गांधीवादी आदर्शचे पालन करत त्यांनी सुरू केलेल्या जनआंदोलनाचे नाव ‘एनर्जी स्वराज’ ठेवले आहे. सन २०१९ मध्ये प्रा. सोळंकी यांनी ३० देशांची यात्रा करून सोलर ऊर्जा संदेश जगभरात पोहचवला आहे. ऊर्जा स्वराज यात्रेत १५ हजार किलोमिटरची यात्रा त्यांनी आतापर्यंत केली असून, सहा भारतीय राज्यातील ३५ हजार पेक्षा अधिक नागरिकांशी संपर्क साधला आहे. या ११ वर्षाच्या यात्रेत ते २८ भारतीय राज्यातील तब्बल दोन लाख किलोमीटरचे अंतर पार करणार असून, यात सर्व पर्यांवरणवासी नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे.

Web Title: Lets Use Solar Energy And Avoid Environmental Degradation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Akolasolar energy
go to top