esakal | सुनेला रॉकेल टाकून जाळणाऱ्या आतेसासुला जन्मठेप
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम न्यूज नांदेड

सुनेला रॉकेल टाकून जाळणाऱ्या आतेसासुला जन्मठेप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः घराबाजुला राहणाऱ्या सुनेसोबत वाद करुन तिला घाटसलेट टाकून पेटविणाऱ्या आरोपी आतेसासुला जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.बी. पतंगे यांच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यासोबत पाच हजार रुपये दंड, दंडाची रक्कम न भरल्यास एक वर्षाचा कठोर कारावास सुद्धा आरोपी आतेसासूला भोगावा लागेल. घटनेतील फरार दुसरी आरोपी अनिता राजू धवसे हिच्या विरुद्धा पकड वॉरंट जारी केला आहे. (Life imprisonment for mother-in-law who burns doughter in law)


घटनेची हकीकत अशी की, मृतक सोनू संजय इंगळे (रा. फेटा, ता. बार्शीटाकळी) तिच्या पती सोबत राहत होती. तिच्या घराच्या बाजुला तिची आतेसासु आरोपी बेबी भारत श्रृंगारे व तिची मुलगी अनिता राजू धवसे राहत होत्या. २७ डिसेंबर २०१२ रोजी सकाळी ९ वाजता आरोपी बेबी भारत श्रृंगारे व तिची मुलगी अनिता राजू धवसे यांचे मृतक सोनू संजय इंगळे हिच्या सोबत भांडण झाले होते. त्या कारणावरुन आरोपी बेबी भारत श्रृंगारे व तिची मुलगी अनिता राजू धवसे यांनी मृतक हिच्या अंगावर घासलेट टाकून तिला जाळले. त्याच दिवशी मृतक सोनू संजय इंगळे हिला सवौपचार रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

हेही वाचा: भाषण सुरु असतानाच अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा सौम्य झटका, प्रकृती स्थिर

घडलेल्या घटनेबाबत तिने पोलिसांकडे मृत्यूपुर्व बयान दिले होते. तसेच घटनेची माहिती तिचे वडिल कैलास कचरु वानखडे यांना सुद्धा सांगितली. त्यामुळे मृतक हिच्या मृत्युपूर्व जबानी वरुन पोलिस स्टेशन पिंजर येथे आरोपी आतेसासू व तिच्या मुलीविरोधात कलम ३०२, ३०७, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता व तपास पूर्ण झाल्यावर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. या प्रकरणामध्ये आरोपी बेबी भारत श्रृंगारे हिचा अटक करण्यात आल्यानंतर तिचा जामीन मिलाला नाही व आरोपी अनिता राजू धवसे ही फरार झाली. प्रकरण न्यायप्रविष्ठ झाल्यानंतर सुनावणी दरम्यान सरकार पक्षाने एकूण ११ साक्षीदार तपासले. मृतक महिलेची साक्ष, साक्षिदारांचे जवाब व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.बी. पतंगे यांनी आरोपी बेबी श्रृंगारे हिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यासोबतच पाच हजार रुपये दंड, दंडाची रक्कम न भरल्यास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सुनावणी दरम्यान संतोष शंकर मोहिते व मृतक सोनू हिचा पति संजय महादेव इंगळे हे सरकार पक्षास फितूर झाले. त्यामुळे संबंधितांना न्यायालयाने नोटीस जारी केली आहे. या प्रकरणी अतिरिक्त सरकारी वकील शाम खोटरे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यांना सुनावणी अधिकारी प्रकाश खाडे यांनी सहकार्य केले.


Life imprisonment for mother-in-law who burns doughter in law

loading image