ऊर्जामंत्र्यांना नाष्टा न दिल्याने लोडशेडिंग; काँग्रेस नगरसेवकांचे अजब वक्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Electricity

ऊर्जामंत्र्यांना नाष्टा न दिल्याने लोडशेडिंग; काँग्रेस नगरसेवकांचे अजब वक्तव्य

लोणार : जगप्रसिद्ध उल्कानगरीत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे एक मार्चला आले होते. त्यावेळी त्यांच्या अल्पोपाहाराची (नाश्ता) व्यवस्था महावितरण अधिकाऱ्यांनी केली नाही. त्या व्देषातून त्यांनी लोणार येथे लोडशेडिंग सुरू केल्याचे वक्तव्य काँग्रेस नगरसेवक आबेद खान पठाण यांनी केले आहे. यामुळे सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

लोणार येथील काँग्रेस नगरसेवक आबेद खान पठाण यांनी 23 एप्रिलला एक बैठकीदरम्यान, पत्रकारांसमोर वक्तव्य केल्यामुळे सर्वच एकच चर्चा होत आहे. त्यांनी बोलताना सांगितले की, ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे लोणार येथे मार्चमध्ये विविध विकास कामाच्या लोकार्पण सोहळ्याला आले होते. त्यावेळी त्यांनी ग्राहक मेळावा आयोजित केला होता. परंतु, त्या ग्राहक मेळाव्याचे प्रचार आणि प्रसार न केल्याने त्या ठिकाणी ग्राहकच बोटावर मोजण्या इतके उपस्थित होते.

त्यानंतर ते त्या ठिकाणावरून लोणार येथील वनकुटी येथे अल्पोहार करण्यासाठी गेले. मात्र, महाराष्ट्र विद्युत विभागाने त्यांची तिथे कोणतीच व्यवस्था न केल्याने त्यांनी तेव्हा पासून लोणार विषयी राग मनात ठेवून आता कारण नसताना अतिरिक्त लोडशेडिंग सुरू केले असल्याचा आरोप केला आहे. सद्या सर्व समाज बांधवांचे सण- उत्सव सुरू आहे. त्यात मुस्लिम समाजाचे पवित्र असे रमजानचे उपवास सुरू आहे.

दुपारी अतिशय उष्ण तापमान असताना ही लोडशेडिंग असल्याने जीव पाणी पाणी करतो. परंतु, अनेक वेळा समाज बांधवांनी विनंती करूनही लोडशेडिंग बंद केली नाही. उलट अतिरिक्त लोडशेडिंग सुरू करण्यात आली आहे. यामध्ये रात्री बे रात्री लाइट जात आहे. त्यामुळे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी कोणतेही दुजा भाव न करता लोडशेडिंग बंद करावी असा घरचा आहेर नगरसेवक आबेद खान पठाण यांनी दिला आहे.

Web Title: Load Shedding Giving Breakfast Energy Ministers Strange Statement Congress Corporators Abed Khan Pathan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top