
अकोला : राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार जिल्ह्यात 30 जूनपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. परंतु लॉकडाउमध्ये प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रासाठी शिथिलता सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी 21 मे रोजी निर्गमित केलेल्या आदेशामध्ये अंशतः बदल केला असून शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार 30 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात मिशन बिगीनः फेज-1, 2 व 3 अनुक्रमे 4, 5 व 8 जूनपासून लागू केला आहे. त्यामुळे अर्थचक्राला गती मिळेल व नागरिकांची कोंडी सुद्धा सुटेल.
टप्प्यानिहाय लॉकडाऊन उघडण्याबाबत निर्देश
० सर्व दुकाने, आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत सुरू राहतील. ग्राहकांकरीता पार्किंगच्या व्यवस्थेचे नियोजन महापालिका आयुक्त, नगर परिषद, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी करतील.
० ई-कॉमर्स क्षेत्राकरीता सर्व प्रकारच्या अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याकरीता परवानगी राहिल.
० महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक, खाजगी, शासकीय बांधकामे परवानगी घेतल्यानंतर सुरु राहतील. पावसाळ्यापूर्वी करावयाची सर्व कामे सुरु राहतील.
० सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आरोग्य व वैद्यकीय, कोषागार, आपत्ती व्यवस्थापन, पोलिस, अन्न व नागरी पुरवठा, महापालिका सेवा या आवश्यकतेनुसार सुरु राहतील.
० शासकीय कार्यालयात एकूण कर्मचाऱ्यांपैकी 5 टक्के किंवा कमीत कमी 10 यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राह्य धरुन सुरू राहतील.
० परवाना प्राप्त असलेले आणि अन्न व औषध प्रशासन यांनी परवानगी दिलेले रेस्टॉरेंट, खाद्यगृहे यांच्या मार्फत घरपोच सेवा देता येईल.
० सर्व प्रकारच्या शासकीय कार्यालयातील आस्थापना एकूण 5 टक्के किंवा कमीत कमी 10 कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राह्य धरुन सुरू राहतील.
० नागरिकांना हालचाल करण्याकरीता चारचाकी वाहनांमध्ये चालका व्यतिरीक्त 2 व्यक्तींना व दुचाकीवर एका व्यक्तीला परवानगी राहिल.
० यापूर्वी परवानगी देण्यात आलेली सर्व दुकाने/, आस्थापना नियमितपणे सुरू राहतील.
मिशन बिगीन ः फेज-1 (4 जूनपासून लागू)
० सर्व प्रकारच्या सार्वजनिक ठिकाणी शारीरिक कसरती जसे सायकलिंग, जॉगींग, धावणे, चालणे यांना सकाळी 5 ते 7 या कालावधीत परवानगी देण्यात येत आहे.
० स्वयंरोजगार संबधित कामे उदा. प्लंबींग, इलेक्ट्रिशिअन, किड नियंत्रण, तांत्रीक कामे इ. कामे करताना सामाजिक अंतराचे सर्व नियम पाळावे तसेच मास्क, सॅनिटायजरचा वापर करणे अनिवार्य राहिल.
० सर्व प्रकारचे वाहन दुरुस्तीबाबतचे गॅरेज, कार्यशाळा यांनी वाहन दुरुस्ती करताना ग्राहकांना ठराविक वेळ देऊन कामे करावी.
मिशन बिगीन फेज-2 (5 जूनपासून लागू)
० सर्व प्रकारच्या बाजारपेठ क्षेत्रामधील दुकाने (मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स वगळून) सम तारखेस सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खालिल अटी व शर्तींच्या आधारे सुरु ठेवण्यास परवानगी राहिल.
० दुकानामध्ये कपडे, वस्त्रे खरेदी करताना ग्राहकांना ट्रायल रुम वापरण्याची परवानगी राहणार नाही. खरेदी केलेला माल हा अदलाबदल किंवा परत करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
० दुकानामध्ये खरेदी करताना सामाजिक अंतरच्या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी संबंधित दुकानदाराची राहिल. त्याकरीता अंतर राखण्याकरीता आवश्यक त्या खुणा करणे, टोकन पद्धती वापरणे, घरपोच सेवा ह्यांना परवानगी राहिल.
० सामाजिक अंतर व इतर नियमांचे पालन होत नसल्याचे निर्दशनास आल्यास संबंधित दुकानावर, आस्थापनावर सील करण्याची कारवाई करण्यात येईल.
० सर्व प्रकारच्या सार्वजनिक स्थळी वाहतूक करताना टॅक्सी, ऑटोरिक्षा, चारचाकी वाहनांमध्ये चालका व्यतिरीक्त इतर दोन व्यक्ती व दुचाकीवर एका व्यक्तीस वाहतूक करण्याची परवानगी राहिल व त्यासाठी योग्य पार्किंग करावे.
मिशन बिगीन फेज-3 (8 जूनपासून लागू)
० सर्व प्रकारचे खाजगी कार्यालये त्यांचेकडे असलेल्या एकूण कर्मचारी संख्येपैकी आवश्यकतेप्रमाणे दहा टक्केपर्यंत कर्मचारी यांचा वापर करु शकतील. त्यासाठी अटी व शर्तींचे पालन आवश्यक राहिल.
० स्पोर्ट कॉम्प्लेक्स, खेळांचे मैदान व इतर सार्वजनिक ठिकाणं व्यक्तीगत व्यायामाकरीता खुले राहतील तथापी प्रेक्षकांना एकत्र येण्यास व सांघिक खेळ खेळण्यास मनाई राहिल. सर्व प्रकारच्या शारीरिक व इतर कसरती करताना सोशल डिस्टंसींगच्या नियमांचे पालन करावे लागेल.
० सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक करताना चारचाकी गाडीमध्ये चालका व्यतिरीक्त इतर २ प्रवासी अनुज्ञेय राहतील. तीन चाकीगाडी (उदा. ऑटो) मध्ये चालका व्यतीरिक्त दोन प्रवासी, दुचाकीवर केवळ चालक यांना परवानगी राहिल, दुसरा प्रवासी अनुज्ञेय राहणार नाही.
० आंतर जिल्हा बस वाहतूक करताना बस मधील असलेल्या एकूण प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के प्रवाशांसह सोशल डिस्टंसिंग व निर्जंतुकीकरण करुन वाहतूकीकरीता परवानगी राहिल. याकरीता विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी नियोजन करावे.
० अनुज्ञेय दुकाने, आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत नियमित सुरु राहतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.