
अकोला : एमआयडीसीत तोकड्या रोजंदारीवर बारा-बारा (कधी-कधी २४) तास काम करून कुटुंबाचा उदर्निवाह करणाऱ्या मजुरांचे अनेक वर्षापासून प्रश्न प्रलंबितच आहेत. सार्वजनिक सुटीचा दिवस व मजुरांना मिळणारी सुटी रविवारी येत असल्याने पाल्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडवतानाही मजुरांची ओढाताण होत आहे.