Akola Crime : राहत्या घरी साडीच्या फडक्याने घेतला गळफास; पत्नी आणि आईने दार उघडले अन्...
Akola Crime Case : महान येथील वार्ड क्रमांक ४ मध्ये राहणाऱ्या विठ्ठल गणपत सवरे (वय ४१) यांनी राहत्या घरात साडीच्या फडक्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
महान : येथील वार्ड क्रमांक ४ मधील रहिवाशी विठ्ठल गणपत सवरे, वय ४१ वर्ष, या व्यक्तीने त्याच्या राहत्या घरी साडीच्या फडक्याने गळफास (Akola Crime Case) घेऊन जीवन यात्रा संपवली. ही घटना दि.८ ऑक्टोबर रोजी दुपारी उघडकीस आली.