
अकोला : महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने कंत्राटी पदभरती विरोधात व इतर काही मागण्यांसाठी शुक्रवापासून (ता.१८) राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. शासनाने काढलेल्या कंत्राटी पदभरतीच्या निर्णयाविरोधात तसेच अन्य मागण्यांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनामुळे रुग्णसेवेसह दैनंदिन वैद्यकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.