समाजसेवेसाठी समर्पित व्‍यक्तिमत्व वासुदेवराव वाघ!

म. गांधींचा स्वच्छतेचा संदेश पोहोचविला घराघरात; उपेक्षितांसाठी समर्पित आयुष्य
समाजसेवेसाठी समर्पित व्‍यक्तिमत्व वासुदेवराव वाघ!
समाजसेवेसाठी समर्पित व्‍यक्तिमत्व वासुदेवराव वाघ!Sakal news

हिवरखेड : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि संत गाडगे बाबांचा स्वच्छतेचा संदेश घराघरात पोहोचविणारे हिवरखेड येथील वासूदेवराव वाघ यांनी संपूर्ण आयुष्य वासुदेवराव वाघ अत्यंत गरीब कुटुंबातुन होते घरात अठरा विश्वे दारिद्र्य होते. पन्नास पैसे ड्रेस प्रमाणे इस्त्री करून देण्याचा व्यवसाय सुरू केला. पुढे संसारात गुंतून न राहता समाजाचे ऋण फेडावे या उद्देशाने महात्मा गांधी आणि गाडगेबाबांच्या विचारावर चालत त्यांनी उपेक्षितांची सेवा सुरू केली.

गाडगेबाबांनी दगडाच्या देवाची पूजा करण्यापेक्षा जिवंत उपेक्षितांची सेवा करा, स्वच्छता ठेवा, जनजागृती करा असे दिले. वासुदेवराव वाघ यांनी आपल्या हलाखीच्या परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा समाजाकरिता जीवन वाहिले. आज जवळपास पासष्ट वर्षांचे वय झाल्यावरही अविरत जनसेवा करीत आहेत.

स्मशान भूमी विकासाचा ध्यास घेऊन वासुदेवराव वाघ यांनी भयावह स्थितीत असलेल्या स्मशानभूमीचा कायापालट केला होता. अंतिम यात्रेत येणाऱ्या लोकांजवळ झोळी फिरवून अल्पशा लोकवर्गणीतून ओटे बांधणे, गुरेढोरे, मूक प्राण्यांसाठी धर्माळ बांधणे, असंख्य झाडे लावणे, फुलबाग तयार करणे, कुंपणाकरिता प्रयत्न करणे, निसर्गरम्य वातावरण निर्मिती करणे, सुविचार लिहिणे, दान दात्यांच्या मदतीने लोकोपयोगी उपक्रम साकारणे, बघता बघता गावातील दोन मोठ्या स्मशानभूमीचा त्यांनी चेहरामोहरा बदलून टाकला.

वासुदेवराव वाघ यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर अनेक जनजागृती पर कार्य केले. अनेक कार्यक्रमांमध्ये, उत्सवांमध्ये वेगवेगळ्या वेशभूषा साकारून मौलिक संदेश जनतेच्या मनात रुजविले. त्यामध्ये प्रमुख्याने स्त्री भ्रूणहत्या थांबवा, बेटी बचाव बेटी पढाओ, लेक वाचवा अभियान, अवयवदान-महा दान, रक्तदान- जीवनदान, स्वच्छता पाळा- डेंगू टाळा, शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, आपल्या कुटुंबाला संकटात टाकू नका, एच.आय. व्ही./ टी.बी.जनजागृती, शौचालय असल्याशिवाय मी या घरची सुन होणार नाही, असे एक नाही तर शेकडो देखावे, नुक्कड नाटक, मिमिक्री, वेशभूषा साकारणे, हजारो लोकांमध्ये जनजागृती करून समाजात परिवर्तन घडविण्याचे मोलाचे कार्य करीत आहेत.

रुग्णांच्या सेवेसाठी धर्मशाळा बांधण्याची इच्छा

वासुदेवरावांचे एक स्वप्न अपूर्ण आहे. त्यांनी बस स्थानक नजीक एक-एक पैसा जमा करून प्लॉट घेतला असल्याची माहिती दिली. ट्रस्टच्या माध्यमातून तेथे गाडगेबाबांची धर्मशाळा बनवण्याचा त्यांचा संकल्प आहे. कारण तेथे बाजूलाच मोठ्या रुग्णालयाची निर्मिती प्रस्तावित असून, बाहेरगावावरून येणाऱ्या रुग्ण व नातेवाईकांना थांबण्यासाठी मोफत निवासाकरिता व सेवेकरिता येथे धर्मशाळा निर्मितीचे त्यांचे अखेरचे स्वप्न असल्याचे वासुदेवराव यांनी ‘सकाळ’शी सोबत बोलताना व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com