

मेहकर : येथील दिवाणी न्यायालयासमोर खंडाळा देवी येथील गजानन राऊत यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना १० मार्च रोजी घडली. ग्रामपंचायत ऑपरेटर प्रदीप ठाकूर व त्यांच्या साथीदारांच्या धमक्यांमुळे हा टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास मेहकर पोलिस करत आहेत.