Akola News: अंडरपासने घेतला एकाचा बळी; साचलेल्या पाण्यात आढळला मृतदेह, पोलिसांचा तपास सुरू

Flood News: अकोल्यातील मध्यवर्ती अंडरपासमध्ये साचलेल्या पाण्यात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. पोलिसांचा तपास सुरू असून मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे.
Akola News
Akola Newssakal
Updated on

अकोला : शहरातील मध्यवर्ती बसस्थानक असलेल्या मदनलाल धिंग्रा चौक परिसरात असलेल्या अंडरपासने एकाचा बळी घेतल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह गुरुवारी सकाळी पाण्यावर तरंगताना आढळून आला. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com