
बार्शीटाकळी: येथील नवीन बस स्थानक समोरील रोडवर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनात बसलेल्या व्यक्तीने अचानक वाहनाचे गेट उघडल्याने महागांववरून अकोलाकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला गेटचा जबर धक्का लागला. त्यामुळे अकोलाकडून मंगरुळपीरकडे धावणाऱ्या एसटी बसखाली दुचाकीस्वार आल्याने त्याचा घटनास्थळावरच मृत्यू झाल्याची घटना ता.५ जून रोजी घडली.