esakal | घटस्फोटासाठी काहीही! युवकानं बस स्टॅन्डपासून मुत्रीघरापर्यंत सर्व ठिकाणी लावले पत्नीचे पोस्टर; मजकूर बघून येईल संताप 
sakal

बोलून बातमी शोधा

divorce

पत्नीने घटस्फोट द्यावा याकरिता त्याने हे कृत्य केले असुन, पत्नीच्या बहिणीचे आणि आईचेसुद्धा फोटो लावुन बदनामी करेन, अशी धमकीसुद्धा त्याने सासरच्या मंडळीला दिल्याचा आरोप सदर युवकावर होत आहे.

घटस्फोटासाठी काहीही! युवकानं बस स्टॅन्डपासून मुत्रीघरापर्यंत सर्व ठिकाणी लावले पत्नीचे पोस्टर; मजकूर बघून येईल संताप 

sakal_logo
By
विनोद खरे

चिखली(जि. बुलडाणा)  : विकृत आणि वेडेपणाचे उदाहरण चिखली तालुक्यात समोर आले असून तालुक्यातील अंचरवाडी येथील एका विवाहित युवतीचे आक्षेपार्ह फोटो मजकूरासह सार्वजनिक ठिकाणी अगदी मूत्रीघरातसुद्धा लावल्याची दिसून आले आहे. 

पत्नीने घटस्फोट द्यावा याकरिता त्याने हे कृत्य केले असुन, पत्नीच्या बहिणीचे आणि आईचेसुद्धा फोटो लावुन बदनामी करेन, अशी धमकीसुद्धा त्याने सासरच्या मंडळीला दिल्याचा आरोप सदर युवकावर होत आहे.

हेही वाचा - बाबाऽऽ बाबा! असे स्वतःचे आयुष्य संपवू नका; फेसबुक लाइव्ह करीत आत्महत्येचा प्रयत्न

समाधान रामदास निकाळजे असे या युवकाचे नाव असुन, तो निमगाव गुरु,ता देऊळगाव राजा येथे राहतो.  यासंदर्भात विवाहितेच्या भावाने अंढेरा पोलिसांत तक्रार दिली असून  अंढेरा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. समाधान याचा विवाह अंचरवाडी येथील एका मुलीशी मागील वर्षी 30 जुन रोजी झाला होता. मात्र पत्नीच्या चारित्याविवर संशय घेत तो सतत शारीरिक व मानसिक त्रास देत होता. त्यामुळे सदर विवाहित हि दिवाळी पासुन माहेरीच राहते होती.

 दरम्यान घटस्फोट मिळावा यासाठी समाधान निकाळजे याने स्वतःच्या बायकोचे फोटो, पोस्टर बनवून सार्वजनिक ठिकाणी लावले व त्यावर गरज पडल्यास संपर्क साधावा असे म्हणुन काही मोबाईल नंबर नमुद करीत लावले होते. याबद्दल विवाहितेच्या भावाने त्याला जाब विचारला असता जोपर्यन्त घटस्फोट मिळत नाही तोपर्यंत एसटी, बस, रेल्वे स्टेशन, सर्व ठिकाणी फोटो लावून बदनामी करण्याची धमकी दिली आहे. 

हेही वाचा - `हमरी उमर ढल गई, लेकीन कोच्छी प्रकल्प नही हुआ`

बायकोच्या बहिणीचे व आईचेही असेच फोटो लावुन बदनामी करीन अशा धमक्या दिल्या आहे. पोलिसांनी  याप्रकरणी अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे हे विशेष.

loading image