

Akola News
esakal
अकोला: मराठा पाटील समाजात वाढत्या घटस्फोटांच्या घटनांनी चिंतेचे वातावरण निर्माण झाले असताना, या समस्येवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी समाज संघटनेने पुढाकार घेतला आहे. विवाह जुळवण्यापासून ते विवाहानंतर निर्माण होणाऱ्या मतभेदांपर्यंत सर्व प्रश्न सोडवण्यासाठी विवाह पश्चात समस्या निवारण समिती स्थापन करण्यात आली असून, या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.