
अकोला : शहरातील खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर करण्यात आलेल्या अतिप्रसंग, मारहाण व त्या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करून मुलीची बदनामी केल्याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत चार आरोपींना अटक केली. आरोपींमध्ये दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे.