Chikhaldara News : १०८ रुग्णवाहिका उठली रुग्णांच्या जीवावर, चिखलदरा तालुक्यातील रुग्णांच्या संदर्भसेवेचा प्रश्न गंभीर
Health care Failure : महाराष्ट्रातील जीवनदायिनी समजली जाणारी १०८ रुग्णवाहिका सेवा चिखलदरा येथे डॉक्टरांच्या मनमानी कारभारामुळे पुन्हा एकदा अपयशी ठरली आहे.
अचलपूर : महाराष्ट्राची जीवनदायिनी म्हणून नावारूपास आलेली १०८ रुग्णवाहिकेची चिखलदरा येथील सेवा केवळ डॉक्टरांच्या मनमानी कारभारामुळे कुचकामी ठरत आहे. याचा प्रत्येय वारंवार येत असताना १७ मे च्या मध्यरात्री पुन्हा एकदा दिसून आला.