esakal | थरार...डोक्यावर असा मारला मार की दोघेही झाले ठार
sakal

बोलून बातमी शोधा

crime (2).jpg

कोरोनामुळे 70 दिवसांचा लॉकडाउन टप्प्या-टप्प्याने अनलॉक होत असतानाच सोमवारी (ता. 8) शहरात दोन व्यक्तींचा दोन वेगवेगळ्या मारहाणीच्या घटनांमध्ये मृत्यू झाला. त्यापैकी एका व्यक्तीचा मृत्यू उपचार घेताना झाला, तर दुसऱ्याचा मृत्यू डोक्यावर जबर मारहाण केल्यामुळे घटनास्थळावरच झाला. दोन्ही प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 

थरार...डोक्यावर असा मारला मार की दोघेही झाले ठार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोनामुळे 70 दिवसांचा लॉकडाउन टप्प्या-टप्प्याने अनलॉक होत असतानाच सोमवारी (ता. 8) शहरात दोन व्यक्तींचा दोन वेगवेगळ्या मारहाणीच्या घटनांमध्ये मृत्यू झाला. त्यापैकी एका व्यक्तीचा मृत्यू उपचार घेताना झाला, तर दुसऱ्याचा मृत्यू डोक्यावर जबर मारहाण केल्यामुळे घटनास्थळावरच झाला. दोन्ही प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 

जुन्या वादातून एकाचा दारूच्या नशेत खून
जुने शहरातील हरिहर पेठमधील पाण्याच्या टाकीजवळील शितला माता मंदिराजवळील सिमेंट पोलवर सोमवारी (ता. 8) दुपारी 2 वाजताच्या दरम्यान मंगेश यादव (वय 45) बसला होता. यावेळी आरोपी वैभव लक्ष्मण काळभागे याने त्याची आई कविता काळभागेच्या मदतीने जुन्या वादातून लाकडी सेंट्रीगच्या दांड्याने मंगेशच्या डोक्यावर मारहाण केली. त्यामध्ये मृतकाच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटननंतर घाबरलेल्या आरोपने दंडा जवळच फेकून दिला व घटनास्थळावरुन फरार झाला. आरोपी वैभव फरार होण्याच्या बेतात असतानाच त्याला स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलिसांनी नायगाव शेत शिवारातून अटक केली. 

मारहाणीत गंभीर जख्मी व्यक्तीचा मृत्यू
अकोट फाईल पोलिस स्टेशन हद्दीतील प्रवीण विजय कांबळे याला घराजवळच राहणाऱ्या कांबळे बाप-लेकांना जबर मारहाण केल्यामुळे मारहाणीत गंभीर जख्मी प्रवीण कांबळेचा सोमवारी (ता. 8) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मृतकाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार रविवारी (ता. 7) दुपारी 3 वाजताच्या दरम्यान प्रवीण कांबळे याला त्यांच्या घराबाहेरच राहणारे गणेश कांबळे व अनिकेत गणेश कांबळे, गोलू उर्फ अविनाश यांनी जबर मारहाण केली होती. त्यामध्ये प्रवीण कांबळेच्या डोक्याला गंभीर मार लागला. मारहाणीत गंभीर जख्मा झाल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डोक्याला जबर मार लागल्यामुळे प्रवाण कांबळेचा सोमवारी (ता. 8) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मृतकाची पत्नी सारिका कांबळेच्या तक्रारीवर पोलिसांनी कांबळे बाप-लेकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.