
अकोला : ‘समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पात अनेकांच्या जमिनी सरकारने संपादित केल्या. पण त्यामागे केवळ भौतिक विकास नसून सामाजिक जबाबदारीही असते. ज्यांची जमीन गेली, त्या भूमिपुत्रांना रोजगार देणे ही केवळ गरज नाही, तर आपली नैतिक जबाबदारी आहे,’ अशी ठाम मागणी विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज पावसाळी अधिवेशनात केली.