अकोल्याच्या ‘मोहित’ची रणजी स्पर्धेसाठी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohit Raut

अकोला जिल्ह्यातील खेळाडू क्रीडा क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी आपापली छाप टाकून अकोल्याचे नाव लौकिक करीत आहेत.

Ranji Cricket : अकोल्याच्या ‘मोहित’ची रणजी स्पर्धेसाठी निवड

अकोला - जिल्ह्यातील खेळाडू क्रीडा क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी आपापली छाप टाकून अकोल्याचे नाव लौकिक करीत आहेत. मूळ अकोल्याचा रहिवासी आणि बिलासपूर (छत्तीसगढ) येथे रेल्वेत कार्यरत असलेल्या मोहित राऊतची नुकतीच रेल्वे क्रिकेट संघात निवड झाली आहे. मोहित अष्टपैलू खेळाडू म्हणून रणची स्पर्धेत रेल्वे संघाकडून खेळणार आहे.

अकोला शहरातील आगार दोनमध्ये प्रभारी वाहतूक नियंत्रक म्हणून कार्यरत असलेले राजेश राऊत यांचा मुलगा मोहित राऊत याने वयाच्या आठव्या वर्षापासून क्रिकेट खेडण्यास सुरुवात केली. प्रशिक्षक प्रवीण मुळे यांच्या मार्गदर्शनात पाहता-पाहता मोहित आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर चांगलीच छाप सोडू लागला. त्यामुळे २००९ साली १३ वर्ष वयोगटात त्याची विदर्भ क्रिकेट संघात निवड झाली. त्यानंतर कधी मागे वळून न पाहणाऱ्या मोहितची २०११, २०१५ आणि २०१८ साली अनुक्रमे १६, १९ आणि २५ वर्ष वयोगटात विदर्भ क्रिकेट संघात स्थान पक्के केले.

शहरातील इंग्लिश हायस्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या मोहितचा ता. २७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या रणजी स्पर्धेत पहिला सामना मध्य प्रदेश संघासोबत होणार आहे. उजव्या हाताने फलंदाजी आणि डावखुरा फिरकी गोलंदाजी व तेवढेच चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर त्याची ता. २४ डिसेंबर रोजी रेल्वे संघाकडून निवड करण्यात आली. विविध स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इंग्लिश हायस्कूलचे प्रिंसीपल प्रदीपसिंह राजपूत यांनी मोहितला नेहमीच सहकार्य केले आहे. मोहितच्या निवडीबाबत क्रिकेट प्रमींसह अकोलावासीयांनी त्याचे अभिनंद केले. मोहित आपल्या निवडीचे श्रेय आई-वडील, भाऊ, शिक्षक, क्रीडा शिक्षक व इतरांना देतो.

नावाजलेल्या स्पर्धेतही केले नेतृत्व

अकोल्याचा रहिवासी रेल्वे क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू मोहित राऊतने याआधी विदर्भ संघासह भारतीय नवोदित खेळाडू व प्रतिष्ठिची समजल्या जाणाऱ्या विजय हजारे, सैय्यद मुश्‍ताक अली स्पर्धेत रेल्वे संघाचे नेतृत्व केले आहे. स्पोर्ट आरक्षणातूनच त्याला रेल्वेमध्ये नोकरी करण्याची संधी मिळाली.