
अकोला : एरव्ही खरिपाच्या पेरणीसाठी ७ जून नंतर हजेरी लावणाऱ्या मॉन्सूनची शेतकरी वाट पाहत असतात आणि ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतर पेरणीला सुरुवात करतात. यावर्षी मात्र, मे मध्ये मॉन्सून पूर्व पावसाने धुवाधार हजेरी लावत जिल्ह्यात ११३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.