बाळापूर: तालुक्यातील मोरगाव सादिजन येथे मंगळवारी (ता. ५) दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीत गावाशेजारी असलेले जनावरांचे तीन गोठे पूर्णपणे जळून खाक झाले असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे..सुदैवाने, वेळीच सावधगिरी बाळगल्याने गोठ्यातील जनावरांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. गावातील मुलांनी मोहाचे पोळे काढण्यासाठी आग पेटवून केलेल्या धुरामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे..Pune News: ‘एमपीएससी’ भरतीला अचानक स्थगिती; सरकारी अभियोक्ता पदांवर वकिलांचा संताप, राजकीय हस्तक्षेपाचा आरोप...मंगळवारी (ता. ५) दुपारी अचानक मोरगाव (सादिजन) येथे आगीची घटना घडली. गावाशेजारील एका गोठ्याला ही आग लागली. वाऱ्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले आणि एकापाठोपाठ एक अशा तीन गोठ्यांना कवेत घेतले. आगीची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गोठ्यात बांधलेल्या जनावरांचे दोर कापून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले, ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली..आगीत साहेबराव टेकाडे, विष्णू टेकाडे, गौरव हिवराळे या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पावसाळा तोंडावर असताना शेती मशागतीसाठी लागणारे पावर टिलर, रिपर आणि इतर महत्त्वाची शेती अवजारे आगीत जळून खाक झाली आहेत..Latest Marathi News Live Update : नसरापूर अत्याचारप्रकरणी येत्या १५ दिवसांत आरोपपत्र दाखल होणार.तसेच गोठ्यात साठवून ठेवलेला जनावरांचा चारा आणि शेतीविषयक इतर साहित्यही भस्मसात झाले. मशागतीची साधने आणि चारा जळाल्यामुळे ऐन पावसाळा तोंडावर असतानाच संबंधित शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. या घटनेचा पंचनामा करून शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे..मोहाचे पोळे ठरले आगीचे कारणगावातील काही मुलांनी मोहाचे पोळे काढण्यासाठी धूर करण्यासाठी आग पेटवली होती. याच आगीच्या ठिणगीमुळे गावालगत असलेल्या गोठ्यांनी पेट घेतला आणि पाहता-पाहता लाखो रुपयांचे नुकसान झाले. मुलांच्या निष्काळजीपणामुळे लागलेल्या या आगीत झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून प्रशासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी मोरगाव सादिजन येथील ग्रामस्थांनी केली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.