
बाळापूर : धावत्या दुचाकीला आग लागल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील शेळद फाट्याजवळ गुरुवारी (ता. २०) रोजी दुपारी साडेचार वाजताच्या घडली. आगीमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नसली, तरी मात्र दुचाकी जळून खाक झाली. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्था खोळंबली होती.