MPSC परीक्षेत भटक्या जमातीमधून प्रदीपकुमार डोईफोडे राज्यात प्रथम

MPSC Pradeep Kumar Doiphode First state
MPSC Pradeep Kumar Doiphode First stateSakal

सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) : मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी खु येथील प्रदीपकुमार जनार्धन डोईफोडे या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाने एमपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नांमध्ये भटक्या जमाती प्रवर्ग 'ड' (एनटी-ड)मधून राज्यांमध्ये प्रथम येण्याचा मान तर राज्यांतून २६ वी रँक मिळवण्याचा बहुमान त्यांनी मिळविला आहे.त्यामुळे मातृतीर्थच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

प्रदीपकुमार डोईफोडे हे एमपीएससी परीक्षांमधून राजपत्रित अधिकारी या पदावर लवकरच रुजू होणार आहे.तालुक्यातील राहेरी खु ह्या ७०० ते ८०० लोकसंख्या असलेल्या छोट्याशा गावामध्ये जल्लोष करून आनंद व्यक्त करण्यात आला.शेतकरी जनार्धन डोईफोडे यांच्या कुटूंबामध्ये कोणत्याही व्यक्ती प्रशासकीय सेवेत नाही,परंतु शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेवुन सुध्दा प्रदीपकुमार डोईफोडे यांनी अभ्यासांच्या जोरावर प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झाले आहे. प्रदीपकुमार जनार्धन डोईफोडे यांचे प्राथमिक शिक्षण हे गांवातील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण झाले आहे.माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी देऊळगांव राजा येथे दाखल झाले त्यानंतर औरंगाबाद येथे इयत्ता ११ व १२ वी पर्यंतचे विज्ञान शाखेत शिक्षण पूर्ण केले.

सिव्हिल इंजिनीअरिंगची आवड असल्यामुळे त्यांनी अभ्यासाच्या भरोशावर जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालय (एमजीएम)औरंगाबाद येथील नामांकित अशा महाविद्यालयात प्रवेश घेतला त्या ठिकाणी त्यांनी सिव्हिल इंजीनियरिंग चे शिक्षण पूर्ण करत असताना त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. सन २०१८ मध्ये सिव्हिल इंजीनियरिंग पदवी पूर्ण केली. प्रशासकीय सेवेमध्ये अधिकारी होण्याचे स्वप्न पाहण्यास सुरुवात केली व स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कोणत्याही प्रकाचे क्लास न लावता स्वतःचा अभ्यास स्वतः करण्याकडेच भर दिला.स्पर्धा परीक्षा देण्यासाठी सुरुवात केली,अभ्यास करण्याचे परिश्रमाच्या भरवशावरच पहिल्याच प्रयत्नांमध्ये त्यांनी एमपीएससी सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षेमध्ये प्राविण्य मिळवले व राज्यामध्ये भटक्या जमाती मधुन प्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.

सिव्हिल इंजीनियरिंग पदवी मिळवल्यानंतर त्यांना अनेक नामांकित कंपनी मध्ये नोकरीची संधी मिळत होती,पंरतु प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याची जिद्द त्यांनी मनाशी तयारी केली होती.कॉलेजचे शिक्षण सुरू असताना औरंगाबाद या ठिकाणीक अभ्यासाची सुरुवात केली.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सन २०१९ मध्ये एमपीएससी सिव्हिल इंजीनियरिंगच्या परीक्षेची जाहिरात निघाली त्यानंतर आपणही प्रशासकीय मध्ये दाखल होऊ शकतो ही मनामध्ये खूणगाठ बांधली जोमाने अभ्यास करण्यास सुरुवात केली.कुटुंबातील आई वडीला कडून सुद्धा नेहमी अभ्यास करण्याचे प्रोत्साहन त्यांना मिळाले, तासन तास फक्त अभ्यासाकडे लक्ष दिले,सन जून २०१९ ला पूर्व परीक्षा दिली.पूर्व परिक्षेमध्ये यश संपादन केल्यानंतर २४ नोव्हेंबर २०१९ मुख्य परिक्षा दिल्यानंतर त्यांचा निकाल सन २०२१ ला मुख्य परीक्षेचा निकालामध्ये उत्तीर्ण होऊन जानेवारी २०२२ ला विभागीय स्तरावर मुलाखत दिली. त्याचा निकाल १२ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला असुन प्रदीपकुमार जनार्धन डोईफोडे यांनी भटक्या जमाती प्रवर्ग 'ड' (एनटी-ड) मधून राज्यांमध्ये प्रथम येण्याचा मान तर राज्यांतून २६ वी रँक मिळवण्याचा बहुमान त्यांनी मिळविला आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जिद्द चिकाटी व कष्ट करण्याची तयार असते.विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्याचे कष्ट घेण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मनावर घेतले तर तो कोणत्याही प्रकारच्या क्लासेस विना परीक्षेमध्ये स्वतःच्या अभ्यासाच्या जोरावर

''प्रशासकीय सेवेतील कोणताही पदापर्यंत पोहोचू शकतो. अभ्यास करत असताना त्यामध्ये सातत्य ठेवणे आवश्यक आहे.अभ्यासाचे सातत्य ठेवल्यामुळेच मी प्रशासकीय सेवेमध्ये दाखवू होवु शकलो.''

- प्रदीपकुमार जनार्धन डोईफोडे, एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com