

अकोला : महावितरणने वीजग्राहकांकडील मीटरचे रीडिंग अचूक होण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. यामध्ये चुकीचे मीटर रीडिंग घेऊन महावितरणच्या महसुलाचे नुकसान करणाऱ्या, तसेच वीजबिल दुरुस्तीसाठी ग्राहकांना नाहक त्रास, मनस्ताप देणाऱ्या राज्यातील सहा मीटर रीडिंग एजन्सीना महावितरणकडून बडतर्फ करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील २ तसेच औरंगाबाद, वसई, नांदेड व अकोला येथील प्रत्येकी एक अशा सहा मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध गेल्या चार दिवसांमध्ये थेट बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. बडतर्फ केलेल्या एजन्सीमध्ये अकोला परिमंडलमधील अजिंक्य महिला बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेचा (अकोला शहर विभाग) समावेश आहे.
मीटरचे अचूक रीडिंग घेण्यात हयगय करणाऱ्या मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध महसुलाचे नुकसान केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई सोबतच एजन्सी व संबंधित कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याची कठोर कारवाई करण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.