
अकोला : वीज आणि पाण्याचा छत्तीसचा आकडा असला तरी अत्यंत धोक्याच्या परिस्थितीत अत्यंत सुरक्षीतपणे महावितरणच्या पिंजर येथील कर्मचाऱ्यांनी भर पावसात पिंजर गावठाण वाहिनीची दुरूस्ती केली आणि वीज पुरवठा सुरू केला केला.महावितरणच्या या जीगरबाज कर्मचाऱ्यांच्या धाडसाचे आणि कार्यतत्परतेचे गावकरी व माध्यम प्रतिनिंधींकडून कौतूक करण्यात येत आहे.