अकोला - अकोला शहरातील सुमारे तीन हजार २०० घरकुलांची उभारणी प्रगतीपथावर असल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून महानगरपालिका क्षेत्रात सुरु असलेल्या घरकुलांची कामे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे ‘टार्गेट’ आहे..मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.सुनील लहाने यांनी नुकताच घरकुल योजनेच्या कामांचा आढावा घेतला. येत्या मार्चपर्यंत घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.शहराच्या विविध भागांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून सद्यस्थितीत सुमारे तीन हजार २०० घरकुलांची कामे सुरू आहेत. महापालिका क्षेत्रात आता पर्यंत १७ प्रकल्प मंजुर करण्यात आले. सुमारे सात हजार घरकुलांना मंजुरी मिळाली. मात्र, शहरात मोठ्या प्रमाणात गुंठेवारीचा भाग आहे. गुंठेवारीचे नियमानुकुल करण्याचे काम महापालिकेने २०१४ पासून बंद केले होते..घरकुल योजनेत अडीच हजार लाभार्थींचे प्लॉट गुंठेवारीचे होते. एकीकडे घरकुल मंजुर तर दुसरीकडे गुंठेवारीचे नियमानुकुल नाही. त्यामुळे प्रारंभीचे काही वर्ष गुंठेवारीच्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभच मिळाला नाही. गुंठेवारीचे नियमानुकुल सुरु झाल्यानंतर खऱ्या अर्थाने महापालिका क्षेत्रात घरकुलांचे काम सुरु झाले. आता तीन हजार २०० घरकुलांची कामे सुरू आहेत.या योजनेतून लाभार्थी कुटुंबांना स्वप्नातील घर पुढील काही महिन्यांत मिळणार आहे. दरम्यान, लोकसभा व विधानसभा निवडणुकांमुळे घरकुलांची कामे रखडली होती. आचारसंहितेत सुरू असलेल्या कामांना निधी मिळत नसल्याने ही कामे रखडली होती. गेल्या आठवडाभरापासून निधीची अडचण दूर झाली असून, लाभार्थ्यांच्या खात्यात धनादेश जमा होण्यास सुरुवात झाली आहे..जिओ टॅगिंगमुळे झाला विलंबजुन्या घरकुलांचे नव्याने जिओ टॅगींग करुन पाठवण्याचे आदेश शासन स्तरावरुन देण्यात आले होते. घरकुल निधी प्राप्त करून घेण्यासाठी लाभार्थ्यांच्या जागेचे, बांधकामाचे फोटो काढून ते शासनाला पाठवावे लागतात. ही सर्व प्रक्रिया तांत्रिक बाब असून ती वेळोवेळी प्रशासनाला पूर्ण करावी लागते. मंजूर घरकुलांचे नव्याने जिओ टॅगिंग करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले होते. यामुळे काही महिने घरकुलांचे काम थांबले होते..हप्ते जमा होण्यास सुरवातआवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाल्यानंतर त्यांनी काम सुरु केले मात्र, निधीअभावी गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून सुमारे आठशे घरकुलांची कामे रखडली होती. त्यात निवडणुका आल्याने बांधकामासाठी निधी मिळण्यास विलंब झाला. आता सुरु बांधकाम असलेल्या घरकुल लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात बांधकामासाठी पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे..महापालिका हद्दीत आवास योजनेतून सध्या तीन हजार २०० घरकुलांचे काम सुरु आहे. मध्यतंरी निधीअभावी कामे खोळंबली होती. गेल्या दहा दिवसांपासून लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. येत्या मार्च महिन्यापर्यंत घरकुलांची कामे पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवले आहे.- श्रीकांत माणिकराव, आवास योजना कक्ष, मनपा, अकोला.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.