

State Election Commission
Sakal
- श्रीकांत राऊत
अकोला - राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम बदलला असून राज्य निवडणूक आयोगाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. मतदार यादी पुनर्रचनेसाठी आवश्यक प्रक्रिया वाढल्याने महानगरपालिका निवडणुका आणखी पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता अधिक बळावली आहे. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिध्द झालेल्या मूळ कार्यक्रमात बदल करून आयोगाने बुधवारी (ता.२६) सुधारीत तारखा जाहीर केल्या.