Murtijapur: अग्निशमन दलाच्या गाडीचे चाक चोरीला; मात्र पोलिसात तक्रार नाही; लाखोंची साधने असूनही शहराची सुरक्षा धोक्यात
Murtijapur Municipal Council: मूर्तिजापूर नगर परिषदेत जुनी अग्निशमन गाडीचे चाक चोरीला; तक्रारही दाखल नाही. नव्या गाड्या खरेदी करूनही चालक व फायरमन अभावी शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.
मूर्तिजापूर : नगर परिषद प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, नगर पालिकेच्या जुन्या अग्निशमन दलाच्या उभ्या असलेल्या गाडीचे चाक अज्ञात इसमाने जॅक लावून काढून नेल्याची गंभीर बाब समोर आली आहे.