

Star-Studded Performances: Kailash Kher and Chala Hawa Yeu Dya Team
Sakal
अकोला : जिल्ह्यातील पर्यटक, निसर्गप्रेमी व सांस्कृतिक रसिकांसाठी नरनाळा पर्यटन महोत्सव हा एक पर्वणी ठरणार असून, ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नरनाळा किल्ला व परिसरात होणाऱ्या या तीन दिवसीय महोत्सवात विविध साहसी, निसर्गाशी निगडित उपक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमांची खास मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे. प्रामुख्याने ‘चला हवा येवू द्या’सह कैलाश खेर, कैलासा यांचा ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’चे आयोजन केले आहे, या महोत्सवात जिल्हयातील जनतेने बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.