esakal | राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना कोरोनाची लागण

बोलून बातमी शोधा

Amol Mitkari

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना कोरोनाची लागण

sakal_logo
By
सकाळ वृतसेवा

अकोला : कोरोनाच्या संकटाच्या काळात पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक नुकतीच पार पडली. त्यात अमोल मिटकरी यांनी मोठ्या प्रमाणात बैठका,सभा घेतल्या होत्या. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

मिटकरी यांनी खुद्द ही माहिती आपल्या सोशल मीडियाच्या social media माध्यमातून दिली असून त्यांनी आपल्या संपर्कात असलेल्या सर्वांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.

अमोल मिटकरी ट्विट करत म्हणाले की, सकाळी थोडा ताप जाणवु लागल्यामुळे मी कोरोना चाचणी केली, ती पॉझिटिव्ह आली असुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच औषधोपचार घेत आहे

संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच जनसेवेत रुजू होईल.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत आमदार मिटकरी यांनी मोठ्या प्रमाणात बैठका,सभा घेतल्या. २ दिवसात मिटकरी यांनी जवळपास 20 च्या वर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. या सभे दरम्यान त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे मोठे नेते देखील होते. रोहित पवार हे देखील अमोल मिटकरी यांच्या सोबत होते.

या दोन दिवसात मिटकरी हजारो कार्यकर्त्यांच्या संपर्कात आले असल्याची माहिती आहे. काल त्यांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट केले जे कोणी आपल्या संपर्कात आले असतील त्यांनी चाचणी करून घेण्याचे आव्हाहन मिटकरी यांनी केले आहे. त्यामुळे आता पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे अनेक स्थानिक नेते सध्या होम क्वारंटाइन झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

संपादन - विवेक मेतकर