NEET Exam Result : नीट परीक्षेत ग्रामीण विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी

जिद्द, मेहनत व चिकाटीच्या बळावर चांडोळसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील नीट परीक्षेत यशाला गवसणी घातली आहे.
NEET Exam Success Students
NEET Exam Success Studentssakal

चांडोळ - जिद्द, मेहनत व चिकाटीच्या बळावर चांडोळसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील नीट परीक्षेत यशाला गवसणी घातली आहे. आरोग्य सेवेचा संकल्प पूर्ण करण्यासाठी गावातील सात विद्यार्थ्यांनी यशस्वी भरारी घेतली हे विशेष!

वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या नँशनल इलिबिटी टेस्ट (नीट) परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवार (ता.४) रोजी जाहीर झाला. त्यात चांडोळ येथील ७ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून आपला प्रवेश निश्चित केला आहे.

नीट परीक्षेतील ७२० गुणांपैकी ६६७ गुण प्राप्त करून यश संपादन केले. नीट परीक्षेत सातही विद्यार्थ्यांनी यशाला गवसणी घालून चांडोळ गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यामुळे समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

गावातून तेजल कैलास चांदा हीने ७२० पैकी ६६७ गुण प्राप्त करीत प्रथम क्रमांक, द्वितीय युवराज विक्रम मरमट ६६० गुण, सुमित मंगल चरावंडे ६०३ गुण, वैभव बजरंग धनावत ५९९ गुण, नम्रता नंदूसिंग महेर ५७७, आशिष अनिल राजपूत ५१७, रोशन राजन मरमट ४६६ असे गुण मिळविले आहेत. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील, शिक्षक या सर्वांना दिले.तसेच त्यांचे मोलाचे मार्गदर्शनच उपयोगी ठरल्याची प्रतिक्रिया दैनिक सकाळशी बोलताना व्यक्त केली.

गावाची परंपरा ठेवली कायम

चांडोळ येथून दर वर्षी पाच-सहा विद्यार्थी नीटच्या परीक्षेत उत्तीर्ण होतात. आरोग्य सेवेचा वसा जोपासणारे असंख्य नामवंत डॉक्टर हे चांडोळचे असल्याने, डॉक्टरांचे गाव म्हणून या गावाला विशेष ओळख प्राप्त झाली आहे. त्यामुळे नीट परीक्षेत यशाची हिच परंपरा येथील विद्यार्थ्यांनी यंदाही कायम ठेवली आहे. बारावी परीक्षेच्या नंतर वैद्यकीय क्षेत्रात जाण्यासाठी नीटची परीक्षा द्यावी लागते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com