esakal | हे तर नवलंच! कोरोनाची चाचणी बुलडाण्यात पॉझिटिव्ह तर अकोल्यात निगेटिव्ह, वाचा कसे...
sakal

बोलून बातमी शोधा

This is a new lunch! Corona test is positive in Buldana and negative in Akola, read how ..

सुलतानपूरला लागलेले कोरोनाचे ग्रहण सुटण्याचे नाव घेत नसतानाच गुरूवारी ( ता. 23) कोरोना पॉझीटिव्ह निघालेल्या त्या 35 वर्षीय रुग्ण महिलेचा चोविस तासाच्या आत अकोला येथील तपासणीत कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून त्या 35 वर्षीय महिलेले आरोग्य विभागाकडून सुट्टी देण्यात आली आहे. महिलेच्या संपर्कातील 16 जनांना मात्र कोवीड सेंटरमध्ये रिपोर्टच्या प्रतिक्षेत क्वारंटाईन ठेवण्यात आलेले आहेत.

हे तर नवलंच! कोरोनाची चाचणी बुलडाण्यात पॉझिटिव्ह तर अकोल्यात निगेटिव्ह, वाचा कसे...

sakal_logo
By
सागर फनाड

सुलतानपूर   ः सुलतानपूरला लागलेले कोरोनाचे ग्रहण सुटण्याचे नाव घेत नसतानाच गुरूवारी ( ता. 23) कोरोना पॉझीटिव्ह निघालेल्या त्या 35 वर्षीय रुग्ण महिलेचा चोविस तासाच्या आत अकोला येथील तपासणीत कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून त्या 35 वर्षीय महिलेले आरोग्य विभागाकडून सुट्टी देण्यात आली आहे. महिलेच्या संपर्कातील 16 जनांना मात्र कोवीड सेंटरमध्ये रिपोर्टच्या प्रतिक्षेत क्वारंटाईन ठेवण्यात आलेले आहेत.


येथील वार्ड क्र. चार मधील 35 वर्षीय महिलेची प्रकृती ठिक नसल्याने लोणार येथे ग्रामीण रुग्णालयात 23 जुलै रोजी नेले असता तिला निमोनिया असल्याचे प्राथमिक तपासात सांगून रुग्णाच्या स्वॅबचे नमुणे बुलडाणा येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले. येथे निमोनियाचा उपचार होत नसल्याने रुग्णांला इतर ठीकाणी निमोनियाच्या उपचारासाठी घेवुन जाऊ घेवुन जा, बुलडाणा येथे गेल्यास तुम्हास "कोविड सेंटरमध्ये उपचार घ्यावे लागतील असे लोणार येथील ग्रामीण रूग्णांलया कडून सुचविण्यात आल्याने रुग्ण महीलेले 24 जुलै अकोला येथे नेण्यात आले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

अशातच बुलडाणा येथील लॅबमधून त्या महीलेच्या स्वॅबचा रिपोर्ट कोराना पॉझिटिव्ह आल्यामुळे सुलतानपूर येथे एकच खळबळ उडाली. प्रशासनाने तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत तो परिसर सिल केला व त्या महीलेच्या संपर्कातील 16 व्यक्तींना लोणार येथे क्वारंटाईन करूण त्यांचे स्वॅबचे नमुणे तपासणी साठी पाठविले.

दरम्यान बुलडाणा येथे त्या महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझीटिव्ह सांगण्यात आला असला तरी त्याच महिलेचा अकोला येथील कोरोना रिपोर्ट निगिटिव्ह आला असून त्या महीलेला सुट्टी दिल्याने सदर महिलेला 24 जुलै रोजी आपल्या घरी आली आहे.


एकाच महिलेचा रिपोर्ट 24 तासांत पॉझिटिव्हचा निगेटिव्ह कसा येवू शकतो? नेमका कोणता रिपोर्ट ग्राहय धरावा ? असे अनेक प्रश्न सुलतानपुर वासीयांकडून उपस्थीत केल्या जात आहेत .

तुम्ही तुमच्या स्वखर्चाने जा
लोणारवरुन अकोला येथे उपचारांसाठी जाण्यास त्या रुग्ण महिलेला शासकीय रुग्णवाहीका उपलब्ध करुन दिली असली तरी मात्र अकोला येथील स्वॅब तपासणीत हीच महिला निगिटिव्ह आली असता तुम्ही तुमच्या स्वखर्चाने आणि स्वःता गाडी करुण घरी जा ! असे सांगण्यात आल्याने त्या ऐकट्या रूग्ण महिलेला तब्बल दोन तास रुग्णालयासमोर ताटकळतं उभं राहवं लागले , हा प्रकार लोणार येथे क्वारंटाईन असलेलेया घरच्या सदस्यांना समजल्यानंतर लोणार येथील शासकीय डॉक्‍टरांना ही रुग्ण महीला माजी सैनिकाची पत्नी असल्याचे सांगितल्यावर डॉक्‍टरांनी त्या रुग्ण महिलेची व्यवस्था करुन सुलतानपूर येथे रात्री दहा वाजता घरी पोहचविले. ही महीला माजी सैनिकाची पत्नी असतांना सुध्दा केवळ आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराची हकनाक बळी ठरल्याने त्या महीलाले प्रचंड मनस्ताप सोसावा लागला ऐव्हढे मात्र खरे.

(संपादन - विवेक मेतकर)