श्वास कंठाशी; खासगीत ‘नो ऑक्सीजन बेड’!

रुग्णांची परवड; केवळ १११ खाटाच उपलब्ध
श्वास कंठाशी; खासगीत ‘नो ऑक्सीजन बेड’!

अकोला : जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे रूग्णांना खाटा (बेड) मिळणे दुरापास्त झाले आहे. खासगी रूग्णालयांमध्ये तर ऑक्सीजनचे बेड जवळपास फुल्ल झाले आहेत. शनिवारी (ता. १७) केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा स्त्री रूग्णालयातच कोरोना रूग्णांसाठी ७० बेड उपलब्ध होते. इतर खासगी रुग्णालयांमध्ये तर केवळ ४१ बेड शिल्लक असल्याने कोरोनाग्रस्तांसह त्यांच्या नातेवाईकांचे टेंशन वाढले आहे. बहुतांश रुग्णालयांमध्ये बेड नसल्याने विशिष्ट खासगी रूग्णालयांमध्ये उपचार करण्यासाठी पोहचणाऱ्यांना शासकीय रूग्णालयाचा आधार घ्यावा लागला.

श्वास कंठाशी; खासगीत ‘नो ऑक्सीजन बेड’!
'प्रेतांची यात्रा' पाहून स्मशानभूमीचंही काळीज धडधडायला लागतं



कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ रोगाने जिल्ह्यात मार्च, एप्रिल २०२० पासून धुमाकूळ घातला आहे. सुरुवातीच्या काळात महानगरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा नंतर गाव, खेड्यात सुद्धा प्रादुर्भाव वाढला. सप्टेंबर महिन्यात तर कोरोनाग्रस्तांच्या संख्येने उच्चांकी गाठली होती. या महिन्यात नव्याने आढळणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन हजारावर पोहचली होती. त्यासह ॲक्टिव्ह रुग्ण सुद्धा एक हजारांवर गेले होते.

श्वास कंठाशी; खासगीत ‘नो ऑक्सीजन बेड’!
मुख्यमंत्र्यांच्या ‘मोफत’ शिवभोजन थाळीने ठेवले अनेकांना उपाशी!

मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा ६० वर जावून पोहचली होती. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा जिल्ह्यात गुणाकार सुरू असल्याचे दिसून आले होते. परंतु ऑक्टोबर महिन्यानंतर कोरोनाग्रस्तांची संख्या सतत कमी होत असल्याचे दिसून आले. दरम्यान आता फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना बाधितांचा आलेख पुन्हा एकदा वाढत आहे. कोरोना मुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची सुद्धा सुद्धा दुपटीने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

श्वास कंठाशी; खासगीत ‘नो ऑक्सीजन बेड’!
बापरे! अकोल्या जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; तीव्रता कमी असल्यानं जीवितहानी नाही


अशी आहे स्थिती

  • - सध्या जिल्ह्यातील २३ रूग्णालयांमध्ये कोरोना बाधितांवर उपचार करण्यात येत आहे. सदर रूग्णालयांमध्ये १ हजार ३५ खाटा ह्या कोरोना बाधितांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. परंतु त्यापैकी केवळ १११ खाटा रूग्णांसाठी रिक्त आहेत.

  • - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ३३, जिल्हा स्त्री रूग्णालयात ३७ ऑक्सीजनच्या खाटा रिक्त आहेत. त्यासोबत खासगीमधील यूनिक्यू हॉस्पीटलमध्ये १३, क्रिस्टल हॉस्पीटलमध्ये १, ठाकरे हॉस्पीटलमध्ये ४, आधार हॉस्पीटल मूर्तिजापूरमध्ये ३, देशमुख हॉस्पीटलमध्ये एक व फातेमा हॉस्पीटलमध्ये १० बेड असे एकूण केवळ १११ खाटा शनिवारी (ता. २७) रिक्त होत्या.

  • - जिल्ह्यातील २३ रूग्णालयांपैकी केवळ १५ खासगी रूग्णालयांमध्‍ये ऑक्सीजनचे बेड उपलब्ध नाहीत. तर केवळ ८ रूग्णालयांमध्येच खाटा उपलब्ध आहेत. त्यातही दोन रूग्णालये शासकीय असून केवळ ६ रूग्णालयेच खासगी आहेत, परंतु त्यामध्ये अतिशय कमी बेड उपलब्ध आहेत.

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com