अकोल्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नऊशेपार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

आणखी एकाचा मृत्यू ः गुरुवारी आढळले 28 नवे रुग्ण

अकोला ः अकोल्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता नऊशेपार गेली आहे. अशातच गुरुवारी एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. तर आणखी नव्याने 28 रुग्ण आढळून आले. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 66 अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 38 अहवाल निगेटिव्ह तर 28 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सकाळच्या अहवालात पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णात 10 महिला व 18 पुरुष आहेत. त्यातील पाच जण आदर्श कॉलनी, तीन जण खदान, दोन जण तार फ़ैल, दोन जण इंदिरानगर वाडेगाव, दोन जण सिंधी कॅम्प येथील तर उर्वरित दसेरानगर, गुलजारपूरा, दगडीपूल, मोहतामिल, अकोटफैल, जीएमसी क्वांर्टर, गंगा नगर, बंजारा नगर, उमरी, शेलारफैल गुरुद्वारापेठ जवळ, नेहरू नगर डाबकी रोड, गुलशन कॉलनी, टॉवर रोड, जुने शहर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

वृद्धाचा मृत्यू
दरम्यान बुधवारी(ता.10) रात्री उपचार घेताना 76 वर्षीय इसमाचे निधन झाले. हा इसम हरिहरपेठ येथील रहिवासी असून, तो 3 जून रोजी दाखल झाला होता.

आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-912
मयत-43(42+1),डिस्चार्ज-577
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-292 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of positive patients in Akola is over nine hundred

Tags
टॉपिकस
Topic Tags: