esakal | अरे बापरे सहा महिन्यांत 37 जणांचे अपहरण!
sakal

बोलून बातमी शोधा

apharan.jpg

डिटेक्शन रेट 89 टक्के ः चार गुन्हे अनडिटेक्ट

अरे बापरे सहा महिन्यांत 37 जणांचे अपहरण!

sakal_logo
By
भगवान वानखेडे

अकोला  अकोल्यात महिला-मुली सोबतच पुरुष, मुले बेपत्ता होण्याचे प्रकरण काही नवे नाही. असे असताना जिल्ह्यात मागील सहा महिन्यांत 37 जणांचे अपहणर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपहरण झालेल्यांची टक्केवारी भयावह आणि तेवढीच चिंताजनक जरी वाटत असली तरी या अपहरण झालेल्यांचा तपास लावण्यात अकोला पोलिसांना 89 टक्के यश आले आहे. मात्र, अपहरण होण्याच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांना आधीपेक्षा अधिक कार्यक्षम होऊन अलर्ट राहणे गरजेचे आहे.

अकोला जिल्ह्यात बेपत्ता मुलींचे प्रकरण मोठ्या प्रमाणात नुकतेच गाजलेले आहे. दाखल आणि अदाखल झालेल्या प्रकरणाचा विचार करता जिल्ह्यातून दरदिवसाला एक पुरुष-महिला बेपत्ता होत असल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात मागील पाच वर्षांत 545 अपहरण झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे जळजळीत वास्तव समोर आले आहे. यामध्ये 2018 आणि 2019 या दोन वर्षात सर्वाधिक अपहरण झाले असल्याचे दिसून येत आहे. असे जरी असले तरी जानेवारी ते जून या सहा महिन्यांत 37 जणांचे अपहरण झाले असून, यापैकी 33 जणांना शोधून काढून आणण्यात यश आले आहे.

अशी आहे धक्कादाय आकडेवारी
वर्ष        अपहरण   शोधलेले      टक्केवारी

2015         73           71               97

2016        80             79              99

2017        96               96           100

2018         133           131              98

2019         126             122             97

2020          37                33             89

टीव्ही, इंटरनेटचा घातक परिणाम
अपहरण करण्याची मानसिकतेला टीव्ही, इंटरनेट आणि बदलेली सामाजिक परिस्थिती कारणीभूत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पळून गेलेल्यांपैकी काही जणांचे अपहरण झाले असल्याची शक्यता असते. अशा विकृत मानसिकतेतून बाहेर येण्याची गरज निर्माण झाली आहे. तर पालकांनीही आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्या प्रत्येक बारीक-सारीक हालचालींवर लक्ष देणे गरजेचे आहे.

4 गुन्हे अनडिटेक्ट
अकोला पोलिस विभागातून सहा महिन्यांत 37 जणांचे अपहरण झाले असल्याची माहिती आहे. यापैकी 33 जणांना शोधून काढण्यात आले आहे. मात्र, अद्यापही चार गुन्ह्यांचा उलगडा झाला नसून, याकडे अकोला पोलिस विभागाला लक्ष द्यावे लागणार आहे.